ययाती- वि .स खांडेकर लिखित कादंबरी चा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही . वि. स. खांडेकरांची 'ययाति' ही ज्ञानपीठ विजेती कादंबरी अशाच एका पौराणिक कथेवर आधारित आहे. प्रस्तुत कादंबरीत कथेतील संघर्षाला चिंतनाची झालर आहे. हे चिंतन क्षणभंगुर भोगवादी आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहतं. "ही कादंबरी ययातिची कामकथा आहें, देवयानीची संसारकथा आहें. शर्मिष्ठाची प्रेमकथा आहें आणि कचाची भक्तिगाथा आहें, हे वाचकांनी लक्षांत घेऊन वाचावी ," अशी अपेक्षा स्वतः खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहें.